समर्थ पोलिसांचा धडाकेबाज कारवाई; कुख्यात चोरट्यांना अटक, रोकड, शस्त्र व वाहन जप्त
पुणे – समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत तीन चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींनी सुमारे ४.५ लाख रुपये किमतीचे रोख रक्कम व सोनं चोरले होते. या प्रकरणातील आरोपी – रोहित उर्फ विनायक भोन्डे, रोहित उर्फ रावण लंका आणि निखिल खांडेकर यांचा तपास शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात आला.
या टोळीने एका घरात घरफोडी करून मोठा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी गुन्हा घडताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोच घेतली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, सोनं व इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.