पुण्यातील प्रसिद्ध इराणी कॅफेचा धक्कादायक प्रकार! अन्नात अळ्या, ग्राहक संतप्त
पुण्यातील कल्याणी नगर येथील प्रसिद्ध इराणी कॅफेमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी येथे चीज चिली टोस्ट ऑर्डर केले असता त्या अन्नामध्ये अळ्या असल्याचे दिसून आले — हा प्रकार पाहून तेथील नागरिक आणि उपस्थित ग्राहक संतप्त झाले.
सर्वात धक्कादायक म्हणजे, हा मुद्दा व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे रेस्टॉरंटच्या स्वच्छतेवर आणि अन्न सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर कल्याणी नगर परिसरात चर्चेला उधाण आले असून, अनेकांनी प्रशासनाने अशा ठिकाणांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे