“चिखलात लोळणारा आधुनिक वराह” – नितेश राणेंवर ठाकरे गटाची घणाघाती टीका
सोलापूर | मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याचे केलेले आवाहन चांगलेच वादग्रस्त ठरत आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून आज (सोमवारी) सोलापुरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या फोटोला वराहाचे तोंड लावून विडंबनात्मक आंदोलन केले. त्यामुळे हा प्रकार शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या आंदोलनावेळी ठाकरे गटाचे शहरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी तीव्र शब्दांत नितेश राणेंवर टीका केली.
“नितेश राणे हा आधुनिक महाराष्ट्रात चिखलात लोळणारा वराह आहे,” अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.