जपान दौऱ्यावर पीएम मोदींचे सेन्दाईत भव्य स्वागत; “मोदी सान वेलकम”चा जयघोष
जपानमधील सेन्दाई शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. “मोदी सान वेलकम” अशा घोषणा परिसरात घुमल्या. भारत-जपान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्वाचा ठरत आहे. या भेटीत व्यापार, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.