कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या विरोधात मनसेचा रोष; संचालकाला थप्पड
कल्याण – मुंबईतील कल्याण भागात मनसे कार्यकर्त्यांनी एका खासगी कोचिंग क्लासच्या संचालकाला चपराक लगावली. यामागे वर्ग शुल्क जास्त घेणे आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांचे फी आकारले जात होते. मात्र, त्या बदल्यात दर्जेदार शिक्षण दिले जात नव्हते, अशी तक्रार काही पालकांनी मनसेकडे केली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी क्लासला भेट दिली आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संचालकाला चापट मारली.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, दोन्ही पक्षांकडून चौकशी सुरू आहे.