कोंढवा मध्ये केवळ १० रुपयात उपचार देणाऱ्या MMC क्लीनिक चे उद्घाटन

कोंढवा , पुणे –
गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत आरोग्य सेवा देणाऱ्या MMC क्लिनिक या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच निवृत्त एसीपी मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांच्या पुढाकाराने कोंढवा परिसरात सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकमध्ये फक्त १० रुपयांत तपासणी, औषधं आणि इंजेक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी हे एक मोठे वरदान ठरत आहे.
याशिवाय सावकारांच्या जास्तीच्या व्याजामुळे त्रस्त नागरिक, बँक संबंधी अडचणी, आरोग्य समस्यांसह इतर सामाजिक प्रश्नांवर देखील हाजी जुबेर मेमन यांची टीम नि:स्वार्थपणे मदतीस तत्पर आहे.
या सामाजिक उपक्रमामुळे हाजी जुबेर मेमन आणि त्यांच्या टीमचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सामाजिक कार्याचा हा आदर्श इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *