Free Health Camp in Kondhwa Pune on 22 July 2025 | Organized by NCP (Ajit Pawar Group)

कोंढवा वार्ड क्रमांक 27 मधील नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि उपयुक्त उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे कार्याध्यक्ष हाजी फिरोज, माजी नगरसेविक रईस सुंडके आणि माजी नगरसेविका परविन फिरोज शेख यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आरोग्य शिबिर मंगळवार, दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी ९ ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरात नागरिकांसाठी खालील मोफत सेवा उपलब्ध असतील:

🔹 डोळ्यांची तपासणी
🔹 मोतीबिंदूवर मोफत ऑपरेशन
🔹 हृदयविकार उपचार व तपासणी
🔹 महिलांच्या गुप्त आजारांवर तपासणी व उपचार
🔹 काही निवडक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया

हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे. गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. * स्थळ: कोंढवा वार्ड क्र. 27 वेलकम हॉल कोंढवा पुणे 48*
🕚 वेळ: सकाळी ९ ते दुपारी 3
📅 दिनांक: 22 जुलै 2025, मंगळवार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *