पाच दुचाकी, एक रिक्षा असा ४.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
पुणे – काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या वाहनांच्या तपासात मोठे यश मिळाले आहे. गुन्हा रजिस्टर नंबर २३७/२०२५ अंतर्गत पोलीस अंमलदार शाहिद शेख व महादेव शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून उत्तर प्रदेशातील आरोपी मोहम्मद नजीम सलमानी (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे, मूळ रा. करनालगंज, लखनऊ, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पाच दुचाकी व एक रिक्षा असा एकूण चार लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संबंधित गुन्ह्यांची काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये आधीच नोंद असून, आरोपीकडून या सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.🔹 जप्त वाहने:
– ५ दुचाकी (स्प्लेंडर, टीव्हीएस, अॅक्टिव्हा)
– १ रिक्षा (CNG)
🛡️ प्रशंसनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी:
▪️ डॉ. राजकुमार शिंदे – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर
▪️ धन्यकुमार गोडसे गोडसे – सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर
▪️ मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन
▪️ अमर काळे – पोलीस निरीक्षक (गुन्हे)
▪️ अमित शेटे – पोलीस निरीक्षक
▪️ प्रविण काळभोर – पोलीस हवालदार
▪️ दाऊद सय्यद – पोलीस अंमलदार
▪️ प्रतीक लहिगुडे
▪️ शाहिद शेख
▪️ श्रीकृष्ण खोकले
▪️ अतुल पेंढकर
▪️ नितीन ढोले
▪️ सद्दाम तांबोळी
▪️ महादेव शिंदे
या पथकाने समन्वय साधून अत्यंत शिताफीने ही कारवाई यशस्वी केली. पुणे शहर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.