पुणे : वारीच्या काळात तसेच इतरही वेळेस रस्त्यावर
जबाबदारीने वागणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु आज वारीमध्ये चालत असताना जुना जेजुरी फाटा झेंडेवाडी येथे रस्त्यावरच एक किया कार (नंबर – MH 12 UF 3332) बेजबाबदार पद्धतीने पार्क केलेली दिसली. या गाडीचा चालक ती गाडी सोडून कुठेतरी गायब झालेला होता. यामुळे रुग्णवाहिकेलादेखील रस्ता मिळू शकला नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. रस्ते सुरक्षा आणि नागरी जाणीव या दोन्ही दृष्टीने ही चुकीची बाब आहे. माझी पुणे पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की कृपया आपण या बेजबाबदार वाहनचालकावर योग्य ती कारवाई करावी.
– खासदार सुप्रिया सुळे