पुणे अपघात: गोखले नगरमध्ये रिक्षाने धडक दिल्याने महिला जखमी
फुटेजमध्ये संबंधित महिला छत्री घेऊन चालत असताना, अचानक एक रिक्षा बाजूने येऊन तिला धडक देते. धडक इतकी जोरदार असते की महिलेला काहीही प्रतिक्रिया देण्याची संधी मिळत नाही आणि ती थेट जमिनीवर कोसळते. त्यानंतर रिक्षाचालक तात्काळ रिक्षा थांबवतो आणि तिच्या मदतीसाठी धाव घेतो.