रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत नागरिक; कारवाई अजूनही नाही
म्हैसमाळ गावातील रस्त्यांची दुर्दशा – 7-8 वर्षांपासून नागरिक त्रस्त
म्हैसमाळ (ता. पुसद) येथील रस्ते गेली 7-8 वर्षे पूर्णपणे खराब अवस्थेत असून नागरिकांना चिखल, मोठे खड्डे आणि वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांची ये-जा आणि दैनंदिन कामे यावर मोठा परिणाम झाला आहे.
नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही MP, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. सेवा प्रतिष्ठानचे कु. अभिष्ण प्रमोद राठोड यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली असून निर्णय न झाल्यास शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी शासनाने त्वरित रस्ता दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

