Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

धायरी पारी कंपनी चौकातील अनधिकृत सीएनजी पंपांमुळे वाहतूक कोंडी; नागरिकांचा तीव्र संताप, आंदोलनाचा इशारा

Unauthorised CNG Pumps Cause Traffic Chaos at Pari Company Chowk in Dhayari; Citizens Furious, Warn of Agitation

पुणे | प्रतिनिधी

धायरी येथील पारी कंपनी चौकात अनधिकृत सीएनजी पंप उभारण्यात आले असून, त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या पंपांमुळे नागरिकांना दररोज तासन्‌तास वाहतुकीत अडकून बसावे लागत असून, शाळकरी मुले, रुग्ण आणि कामावर जाणारे नागरिक यांच्यावर याचा मोठा परिणाम होत आहे.

संबंधित भागातील काही बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करत हे पंप उभारले आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन कोंडीला कारणीभूत ठरत आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी आपापल्या गल्लीत पंपांकडे जाणाऱ्या मार्गांवरही अडथळे निर्माण केले आहेत.

या प्रकरणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, सनी रायकर, निलेश दमिठे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पुणे महापालिकेला निवेदन दिले असून, सात दिवसांत सर्व अनधिकृत पंप व अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.

धनंजय बेनकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,

> “जर सात दिवसांत पंप व अतिक्रमण हटवण्यात आले नाही, तर आम आदमी पक्ष तीव्र आंदोलन करणार असून, गरज भासल्यास उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार आहे.”

 

दरम्यान, प्रशासनाने काही पंपांवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण काढले असले तरी उर्वरित अनधिकृत गाळे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे रचनेवरील बांधकाम अजूनही सुरूच आहेत.

नागरिकांनी दिलेला स्पष्ट इशारा:

> “आम्ही आंदोलन करू, रस्ता मोकळा करा नाहीतर मोठ्या चळवळीला सामोरे जा!”

Exit mobile version