कोंढव्यात माजी नगरसेवकांच्या जावयाची दहशत!

कोंढव्यात माजी नगरसेवकांच्या जावयाची दहशत!

“पोलीस अ‍ॅक्शन घेणार की राजकीय जामीन?”

काल दिनांक 05 ऑगस्ट 2025, रात्री अकराच्या सुमारास कोंढव्यातील चेतना गार्डन सोसायटीमध्ये भीतीदायक घटना घडली.
अजितदादा गटाचे माजी नगरसेवकांचे जावई जावेद पठाण व त्याच्या मित्रांनी मिळून परिसरातील गाड्यांची तोडफोड करत, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची तक्रार समोर आली आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिक संतप्त असून, अजूनही आरोपी अटकेत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहेत.
नागरिकांचा थेट सवाल –
👉 “हा जावई असल्यामुळे पोलीस मवाळ आहेत का?”
👉 “काय त्याला अटक होणार की थेट अटकपूर्व जामीन मिळवून दिला जाणार?”

स्थानिक पोलीस प्रशासन, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे नागरिक विचारत आहेत –
“राजकीय दबावापासून पोलीस यंत्रणा मोकळी आहे का?”

🔴 आता सर्वांच्या नजरा पोलीस कारवाईकडे वळलेल्या आहेत…

📣 न्याय मिळणार का? की राजकारण पुन्हा वरचढ ठरणार?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *