मुंबईत पावसाचा कहर, शाळेच्या बसमध्ये अडकलेली मुले सुरक्षित बाहेर काढली
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने रेड अलर्ट जाहीर केला असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र या दरम्यान माटुंगा परिसरातील एका नामांकित शाळेची बस पाण्यात अडकली. बसमध्ये लहान मुले अडकून पडल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. धो-धो पावसात पोलिसांनी पुढाकार घेत सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका केली. या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.