Father Beats Son in Theatre for Watching Saiyara Again
सध्या सोशल मिडियावर “सैयारा” या चित्रपटाचे विविध सीन, गाणी आणि डायलॉग्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमुळे अनेक तरुण पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहताना दिसत आहेत.
मात्र, याच पार्श्वभूमीवर हरियाणामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरुण मुलगा सतत “सैयारा” चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला जात असल्याने त्याच्या वडिलांचा पारा चढतो. अखेर वडील थेट चित्रपटगृहात घुसतात आणि सर्वांसमोरच आपल्या मुलाला जोरदार मारहाण करतात.
हा संपूर्ण प्रकार उपस्थित प्रेक्षकांनी मोबाईलवर शूट केला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. काही जण या प्रकारावर हसतायत, तर काही जण पालकांच्या रागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत