Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

मुंबईत सिनेमागृहात ड्रामा! अभिनेत्री रुची गुज्जरने निर्माता मान सिंगला चप्पलने मारले;

Ruchi Gujjar Slaps Actor-Producer Man Singh at Mumbai Theatre Over ₹24 Lakh Dispute | FIR Filed

मुंबई | 26 जुलै 2025 — मुंबईतील प्रसिद्ध सिनेमागृह सिनेपोलिस मध्ये ‘सो लॉन्ग व्हॅली’ चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. अभिनेत्री रुची गुज्जर हिने रागाच्या भरात चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता मान सिंग यांना चक्क चप्पलने मारले, ज्यामुळे तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रुची निर्माता मान सिंग आणि दुसऱ्या निर्माता करण सिंग चौहान यांच्याशी जोरजोरात भांडताना दिसते, आणि त्यानंतर ती चप्पलने मान सिंगला मारते.

सूत्रांनुसार, हा वाद २४ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून झाला आहे. यासंदर्भात रुची गुज्जर हिने २४ जुलै २०२५ रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात करण सिंग चौहानविरोधात फसवणूक, विश्वासघात आणि धमकी देणे अशा गंभीर आरोपांसह FIR दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि चर्चेला जोर धरला असून चाहत्यांमध्येही या वादामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Exit mobile version