लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली लाखोंचा माल लंपास करणाऱ्या महिलांचा शेवट पोलिस कोठडीत – पाहा काय म्हणाले DCP मिलिंद मोहिते!
कॅम्प परिसरातून समोर आलेल्या फसवणुकीच्या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. लग्नाच्या खरेदीच्या बहाण्याने व्यापाऱ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांना लष्कर पोलिसांनी अटक केली असून आता त्या पोलिस कोठडीत आहेत, अशी माहिती लष्कर विभागाचे डीसीपी मिलिंद मोहिते यांनी दिली आहे.
तपशीलानुसार,
या महिलांनी स्वत:ला आयपीएस अधिकारी म्हणून दाखवले आणि “कमिशनर ऑफिसमध्ये पैसे देतो” असे सांगत व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले.
त्या दोघींनी —
चप्पल दुकानातून सुमारे १७ हजारांचा माल,
ज्वेलरी दुकानातून तब्बल १ लाख ४० हजार रुपयांची दागिने,
आणि गारमेंट दुकानातून ७० हजारांचा माल घेत दुकानदारांची फसवणूक केली होती.
यातील एका महिलेला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले होते, त्यानंतर दुसरी महिलाही अटकेत आली आहे.
डीसीपी मिलिंद मोहिते यांनी सांगितले —
“दोन्ही महिलांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली असून चौकशीत आणखी काही फसवणुकीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.”
लष्कर पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.