सिलेंडर गॅस स्फोटात आई-वडिलांचा मृत्यू; पाच लहान मुलं संकटात – मदतीची गरज
येवलेवाडी, पानसरे नगर गल्ली क्र. १ येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका मुस्लिम कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. घरात गॅस सिलेंडर गळतीमुळे झालेल्या स्फोटात पाच मुलांचे आई-वडील दुर्दैवाने निधन पावले असून घर उद्ध्वस्त झाले आहे.
सध्या ही पाचही मुले गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुलांची परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांना आधार देणारे कोणीही उरलेले नाही. शिक्षण, अन्नधान्य व राहण्याची सोय या सर्व गोष्टींसाठी समाजाची मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे.
स्थानिक नागरिकांनी तसेच पुणे व कोंढवा परिसरातील काही मशिदींमार्फत मदतकार्य सुरू केले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या मुलांच्या शैक्षणिक व जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी पुढे यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
संकटग्रस्त मुलांना मदत करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 8484864953 – जनाब मुफ्ती इम्रान नदाफ
📞 7972553687 – जनाब इम्रान पिरजादे