Pune Rave Party Raid: Khadse’s Son-in-law Involved?

पुणे शहरात एका लक्झरी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. ही कारवाई शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) गुप्त माहितीवरून केली असून, या पार्टीत अनेक उच्चभ्रू व्यक्ती आणि व्यावसायिक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे. मात्र, या बाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मादक पदार्थ, मद्य, आणि संगीत सिस्टीम जप्त केली असून, उपस्थित असलेल्या अनेक जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. काहीजणांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, उच्चभ्रू वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *