Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

सराईत आरोपीकडुन गावठी बनावटीचा कट्टा जप्त

सराईत आरोपीकडुन गावठी बनावटीचा कट्टा जप्त

दि.१२/०८/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलीरा अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, सर्प उद्यानकडुन मोरे बाग बस स्टॉपकडे जाणा-या रोड दरम्यानच्या फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबलेला आहे.

सदरची बातमी मिळाल्याने तात्काळ पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे तौकीर रफिक शेख, वय १९ वर्षे, रा. गल्ली नंबर ०१, मक्का मरजीद जवळ, कोंढवा, पुणे हा त्याचे ताब्यात ५०,०००/-रु.कि.चा एक गावठी बनावटी कट्टासह मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा जप्त करुन त्यावेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं.३७७/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यारा दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि २ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय यौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Exit mobile version