पुण्यात भर चौकात दहशत : एका तरुणावर कोयत्याने सपासप वार
पुण्यातील पाषाण परिसरात भर चौकात दहशत माजवणारी घटना घडली आहे. जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना गणेश मंडळाजवळ घडली असून, परिसरातील सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
भररस्त्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.