पुण्यात MIT कॉलेजबाहेर राडा; विद्यार्थ्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी!
पुणे – कोथरूडमधील MIT कॉलेजच्या बाहेर दोन विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये जोरदार झटापट झाली. या घटनेचा व्हिडीओ काही बघ्यांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही. घटनेची अधिकृत माहिती देताना कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी गुरुवारी सांगितले की, “सदर प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तसेच, नेमका प्रकार कोणत्या दिवशी घडला हे तपासले जात आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, व्हिडीओमध्ये दोन्ही गटांमध्ये झालेली जोरदार धक्काबुक्की स्पष्टपणे दिसत असून परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला आहे