Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : मोबाईल व दुचाकी चोरी करणारा इसम अटकेत

काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई : मोबाईल व दुचाकी चोरी करणारा इसम अटकेत

पुणे : काळेपडळ पोलिसांनी मोठी कामगिरी करत मोबाईल व दुचाकी चोरी करणाऱ्या एका इसमाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ₹४,१७,५०० किंमतीचे १५ मोबाईल हॅन्डसेट आणि दोन दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

काळेपडळ पो.स्टे. गु.रजि. नं. १९५/२०२५ दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोबाईलचे लोकेशन मिळवले. त्यानुसार पोलिसांनी तरवडेवस्ती, महंदवाडी, पुणे येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची ओळख शंकर गणपत गायकवाड (रा. तरवडेवस्ती, पुणे) अशी झाली आहे.

आरोपीकडून पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या दोन साथीदारांसह काळेपडळ व भारती विद्यापीठ परिसरातून मोबाईल चोरी केल्याचे, तसेच रस्तापेठ व हांडेवाडी परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.

🔹 हस्तगत मुद्देमाल

व्हिवो, रेडमी, रियलमी, ओप्पो, सॅमसंग व अॅपल कंपनीचे एकूण १५ मोबाईल हॅन्डसेट

ज्युपिटर मोपेड (MH-12 QL 6689)

होंडा डिओ दुचाकी (MH-12 NQ 2166)

या कारवाईत एकूण ₹४,१७,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, तसेच मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

पथकात अमित शेटे (सहाय्यक पोलीस निरीक्षक), प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर यांचा समावेश होता.

Exit mobile version