“पाच वर्षांपासून पात्र लाभार्थ्याला ताब्यात नकार – गणेश पेठ एसआरए घोटाळा उघड!”

पुणे – गणेश पेठ, 237 नाडे गल्ली येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) अंतर्गत. राफे लक्कडवाला वेंचर या विकसकाने प्रकल्प पूर्ण करूनही पात्र लाभार्थ्याला पाच वर्षांपासून ताबा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

लाभार्थी रईस इसाक शेख यांची बिगर निवासी गाळ्यासाठी पात्रता सन 2019 मध्येच एसआरएकडून निश्चित झाली होती. मात्र विकसकाचा दावा – “लाभार्थ्याने प्रकल्पाला संमती दिली नाही” – या कारणावरून ताबा नाकारला जात आहे.

स्थानिकांच्या मते, एसआरएचे काही अधिकारी व कर्मचारी विकसकाच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे पात्र असूनही पाच वर्षांपासून नागरिकाला हक्काचा गाळा मिळत नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

योजनेतील या वादामुळे पुनर्वसनातील पारदर्शकता, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या हक्कांवर गदा या तिन्ही बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिकांचा रोष –
“पात्र असूनही 5 वर्षे ताबा न देणे म्हणजे सरळ अन्याय! अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे जात आहेत का? चौकशी झाली पाहिजे!”

जनतेची मागणी:

1. रईस शेख यांना तातडीने हक्काचा गाळा द्यावा.
2. विकसक व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी.
3. पुनर्वसन योजनांतील गैरव्यवहार थांबवावे.

हा अन्याय थांबवण्यासाठी आवाज उठवा, ही बातमी शेअर करा आणि “हक्काचा गाळा मिळालाच पाहिजे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *