पुणे : गांज्याची विक्री करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अखेर जेरबंद

पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी मंतरवाडी, कात्रज रोड परिसरात धडक कारवाई करत रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून सुमारे ₹21.16 लाखांचा मुद्देमाल, ज्यामध्ये गांजा, वाहन आणि मोबाईलचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.

ही कारवाई 4 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली. पोलिस पेट्रोलिंग दरम्यान, मेट्रो मोटर्स समोर एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार फोर व्हिलरमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरीत्या बसलेला दिसून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत झडती घेतली असता, वाहनाच्या मागच्या सीटवर पिवळसर-हिरवट रंगाच्या नायलॉनच्या पोत्यात भरलेली १५ पॅकेट सापडली.

या पॅकेटमध्ये एकूण २६ किलो ८० ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची बाजारमूल्य अंदाजे ₹५.३६ लाख आहे, आढळून आला. त्याचबरोबर महिंद्रा थार वाहन आणि मोबाईल फोन मिळून एकूण ₹२१.१६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिल ऊर्फ अण्णा सुभाष राख असून तो पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४६/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८ (क), २० (ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *