Pune Couple Caught in Public Romance on Bike – Video Viral

पुणे जिल्ह्यातील शिंदेवाडी ते खेड शिवापूरदरम्यानच्या महामार्गावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दुचाकीवर प्रवास करणाऱ्या कपलचा ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ स्टाईलने सार्वजनिक ठिकाणी प्रेम प्रदर्शन करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियावर अशा वर्तनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.हा प्रकार महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी घडल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रेमप्रदर्शन केल्यामुळे लहान मुलांवर व समाजावर चुकीचा परिणाम होतो, असे मत अनेकांनी मांडले आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनानेही या प्रकाराची दखल घेतली असून संबंधित व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *