अपहरण आणि भीक मागणं! पुण्यातील संतापजनक घटना उघडकीस

पुणे – भीक मागण्यासाठी दोनवर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील सीताराम भोसले (५१, रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (५०), गणेश बाबू पवार (३५), शालूबाई प्रकाश काळे (४५, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापूर, जि. धाराशीव) आणि मंगल हरफुल काळे (१९, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या तपासात समोर आले की, या चिमुकलीचे अपहरण करून तीला पुण्यात भीक मागण्यासाठी रस्त्यावर उतरवण्यात आले होते. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याआधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

या अमानवी कृत्यामुळे समाजमन संतप्त झाले असून, अशा घटनांवर कडक कारवाई होण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *