“‘कोणत्या तोंडाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार?’ – ओवैसींचा संतप्त सवाल सरकारला”
नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत “ऑपरेशन सिंदूर” संदर्भात बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
ओवैसी यांनी भारतीय जवानांवर पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख करत आशिया चषकात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी विचारलं की, “जेव्हा पाकिस्तानकडून सतत घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया सुरू आहेत, तेव्हा कोणत्या तोंडाने आपण त्यांच्यासोबत क्रिकेट सामना खेळतो?”
यावेळी ओवैसी म्हणाले, “सरकार ऑपरेशन सिंदूरचे श्रेय घेत आहे, हे चांगले आहे. पण दुसरीकडे त्या देशासोबत खेळणं म्हणजे शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचं अपमान नाही का?”
तसेच, त्यांनी भारत-पाक क्रिकेटबाबत सरकारची स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली. लोकसभेतील त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चा अधिक तापली असून, सोशल मीडियावर देखील यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत