वाहतूक नियमांचा भंग; नागपुरातील तीन युवकांचा व्हिडिओ चर्चेत
नागपुरातून समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये रील्ससाठी बेफिकीर कसरती करताना युवक दिसत आहेत. बुलेट मोटारसायकलवर हेल्मेटशिवाय एक जण वाहन चालवत आहे, तर मागे बसलेला दुसरा व्यक्ती मोबाईलवर चित्रीकरण करत आहे. यावेळी तिसरा युवक थेट बुलेटच्या पुढील चाकाच्या मडगार्डवर बसलेला दिसतो. या धोकादायक प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांकडून कारवाईची मागणी होत आहे.