मुंब्रा: रिक्षाचालकाला लाथाबुक्या आणि काठ्यांनी मारहाण
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून ४ ते ५ जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. हा प्रकार मुंब्रा येथील रिक्षा स्टँडजवळ घडला असून, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जणांनी रिक्षाचालकाला पकडून ठेवले, तर इतरांनी लाथाबुक्यांसह काठ्यांनी त्याला जमिनीवर पाडून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती, मात्र कोणीही पुढे येऊन मदत केली नाही.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.