मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा, लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. विशेषत: विक्रोळी-कुर्ला दरम्यानच्या मध्य रेल्वे मार्गावर पाणी शिरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, चेंबूरसह अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.