मुंबईत मराठा आंदोलकांचा एल्गार; CSMT परिसरात चक्काजाम आंदोलन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलबाहेर मोठा राडा झाल्याचं चित्र दिसून आलं. आंदोलकांनी आरोप केला की, “आमच्या गाड्या मुद्दाम अडवल्या जात आहेत.”
या निषेधार्थ मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आणि थेट चक्काजाम आंदोलन छेडलं. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चांगलाच पेटला असून, येत्या काही दिवसांत आंदोलकांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.