मोदीखान्यात अज्ञात चोरट्यांनी दोन यामाहा गाड्या लंपास केल्या
पुणे, प्रतिनिधी:
मोदीखाना येथील हॉटेल मॅजेस्टिकच्या पाठीमागील रहिवासी भागातून दोन यामाहा दुचाकी गाड्या दिनांक 28 जुलै 2025 रोजी पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सदर घटनेबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या चोरीस गेलेल्या गाड्या कोठेही आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.