आठ वर्षांनंतर बेपत्ता मुलाचा शोध; आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
बीड : 2017 मध्ये हरवलेला एक मुलगा अखेर शोधून काढण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या मुलाला शोधून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील नवनीत कावत यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला असून, पाहता पाहता तो हजारों लोकांपर्यंत पोहोचला. या घटनेनंतर बीड पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक माध्यमांवर नागरिकांनीही पोलिस दलाच्या संवेदनशीलतेचे आणि प्रयत्नशीलतेचे अभिनंदन केले असून, ही घटना पोलिसांच्या जनसेवेच्या बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.