‘कबड्डी, कबड्डी’च्या घोषात आरक्षणाचा आवाज – मराठा बांधवांचा अनोखा विरोध
मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आंदोलकांच्या विविध हालचालींचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधीलच एक व्हिडीओ विशेष चर्चेत आला आहे.
या व्हिडीओत मुंबईत दाखल झालेले काही मराठा तरुण मराठी मातीतला पारंपरिक खेळ ‘डाव’ खेळताना दिसत आहेत. कठीण परिस्थितीतही आपल्या संस्कृतीची जपणूक करत आंदोलनस्थळी खेळलेला हा डाव मराठा बांधवांच्या जोशाचे आणि एकतेचे दर्शन घडवतो, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.