Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

मनोज जरांगे लिफ्टमध्ये शिरताच भीषण अपघात; लिफ्ट कोसळल्याने खळबळ!

मनोज जरांगे लिफ्टमध्ये शिरताच भीषण अपघात; लिफ्ट कोसळल्याने खळबळ!

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील बीड दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना घडली. बीड शहरातील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटल येथे रुग्णांच्या भेटीसाठी गेले असताना, ज्या लिफ्टमध्ये ते होते ती लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. या दुर्घटनेत जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले आहेत.

ही घटना आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. लिफ्ट अचानक बंद पडली आणि तांत्रिक बिघाडामुळे जोरात खाली आदळली. दरवाजे बंद असल्याने, जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टमध्येच अडकून पडावं लागलं. परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव होताच तत्काळ लिफ्टचे दरवाजे फोडण्यात आले आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

घटनेनंतर रुग्णालयात आणि परिसरात एकच गोंधळ उडाला, काही काळ भितीदायक वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजना आणि तांत्रिक तपासणीचे आदेश दिले गेले आहेत.

या अपघातामुळे रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर अनेकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. सध्या जरांगे पाटील सुखरूप असून त्यांची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे

Exit mobile version