कोंढव्यात लाईट-पाण्याचा गोंधळ; मेणबत्त्यांच्या उजेडात शिक्षण!
कोंढव्यातील नागरिक लाईट आणि पाण्याच्या मूलभूत गरजांसाठी अक्षरशः झगडत आहेत. दिवसातून ५ ते १० तास वीज गायब होते. लहान मुले मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करत आहेत, आणि पालक म्हणतात — “शिकवायचं तरी कसं? मेणबत्तीची किंमत ३ ते १० रुपये झाली, आणि कमावणारा घरात एकच!”
या असुविधांमुळे नागरिक संतप्त आहेत, पण माजी नगरसेवक म्हणतात – “कोंढव्यात विकास केलाय!”
पण नागरिक विचारतात — कुठे केलात हा विकास? आमचं आयुष्य अंधारात चाललंय आणि तुम्ही दाखवताय कोंडव्याचा विकास ?
कोंढवा कुठे नेऊन ठेवलाय?
शाळकरी मुलांचं भविष्य मेणबत्तीवर ठेवलंय का?
स्थानिक प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज असून, कोंढवा आजही मुलभूत सुविधांसाठी झगडतोय, हे वास्तव आहे.
“कोंढव्यात खऱ्या अर्थानं प्रकाश द्यायचा असेल, तर लाईट-पाणी नियमित व्हावं, हीच जनतेची मागणी आहे!”