Kalyan: Marathi Receptionist Brutally Assaulted by Outsider at Private Hospital

कल्याण – नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रिसेप्शन डेस्कवर कार्यरत असलेल्या मराठी तरुणीवर एका परप्रांतीय तरुणाने केवळ MRI संदर्भात माहिती दिल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण केली.

ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. संबंधित तरुणीने एका रुग्णाच्या नातेवाइकाला शांतपणे सांगितले की, “डॉक्टर MRI साठी व्यस्त आहेत, कृपया थोडा वेळ थांबा.” मात्र, एवढ्यावरच संतापून गोपाल झा (असलेल्या आरोपीचे नाव) या तरुणाने तरुणीवर अचानक हल्ला चढवला आणि तिला बेदम मारहाण केली.

संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून, महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एक सुरक्षित ठिकाण मानल्या जाणाऱ्या रुग्णालयातच महिलांवर हल्ला होणे, ही समाजातील गंभीर बाब आहे, असे अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *