Kalyan: Migrant Man Assaults Marathi Receptionist in Hospital, FIR Filed Against Gokul Jha

कल्याण शहरातील एका खाजगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका परप्रांतीय इसमाने रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्ट महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या इसमाचं नाव गोकुळ झा असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणाबाबत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

> “आरोपी गोकुळ झा याने रिसेप्शनिस्ट महिलेशी वाद घातला आणि नंतर तिच्यावर हात उचलला. तक्रारीच्या आधारे आम्ही त्वरित गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.”

 

पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही एसीपी हेमाडे यांनी स्पष्ट केले.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांत संतापाची लाट पसरली असून, परप्रांतीयांवरील नियंत्रणाची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *