गाडीत पाणी शिरलं आणि… चालकाने उडी मारली, थरारक प्रसंग कॅमेऱ्यात
कल्याण-डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अशाच एका ठिकाणी बघता बघता एका कारमध्ये पाणी शिरलं. पाणी गाडीत झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ गाडीबाहेर उडी मारून आपला जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनेक भागांत पाणी साचले असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.