जालन्याच्या DSPची फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाच्या कमरेत लाथ
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आगमन झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या महिन्याभरापासून उपोषण करणारे अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना थांबवले.
यावेळी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दोन्ही आंदोलक कौटुंबिक वादातून पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप करत आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यात पोलिसांच्या भूमिकेबाबत चर्चेला उधाण आले आहे.