हिंजवडी चौकात दोन दुचाकीस्वारांत चक्क रस्त्यावर भांडण
हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन बाईकस्वारांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून चौकात मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतानाही कुणीही भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
घटनास्थळी काही वेळ दोन्ही बाईकस्वारांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि मारामारी सुरू होती. अखेरीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने मध्यस्थी करत दोघांना वेगळं केलं. हा प्रकार पाहून स्थानिकांत आणि नेटकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.