मुसळधार पावसामुळे कल्याण-शिलफाटा रोडवर पाणी साचले
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कल्याण-शिलफाटा रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक वाहनं बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांना शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे