मुंबईत पावसाचा तांडव! रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी वेस्ट परिसरातील वीरा देसाई रोड जलमय झाला आहे. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.