हातात कोयता, डोक्यात थैमान! हडपसरमध्ये युवकाने पसरवली भीती
पुणे | प्रतिनिधी:
हडपसरच्या साडेसतरा नळी परिसरात एका कोयताधारी युवकाने प्रचंड हैदोस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर युवकाने हातात धारदार कोयता घेऊन परिसरात धावपळ केली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून युवकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तो पोलीसांच्या ताब्यात आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
प्राथमिक माहिती अशी की:
युवकाचे वर्तन अत्यंत आक्रमक आणि संशयास्पद होते.
काही लोकांना धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
तो कोयता गँगशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.