Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

गोकुळ झा याची खुलेआम धमकी – कायद्याला ठेंगा दाखवत गुन्हेगार बिनधास्त

Gokul Jha Threatens Journalists After Assaulting Marathi Girl – Law and Order Under Question

मराठी तरुणीला निर्घृण मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याचा माज अजूनही कायम आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतरही तो सुधरला नसून, आता त्याने थेट पत्रकारांनाच धमकी दिली आहे.

“परत तुम्हाला भेटतो!” – असा थेट इशारा आरोपी गोकुळ झा याने पत्रकारांना पोलिसांसमोरच दिला. यामुळे केवळ पत्रकारांच्याच नव्हे तर कायद्याच्या यंत्रणेच्या सुरक्षेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र कोठडीत असतानाच, पत्रकारांशी वागताना त्याने अरेरावीची भाषा वापरली आणि पोलिसांचीही खिल्ली उडवली.

पोलिसांची भूमिका संशयास्पद?

पत्रकारांवर खुलेआम धमकी देत असताना पोलिसांनी कुठलाही आक्रमक पवित्रा घेतला नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे. कायद्याचा धाक उरलेला नाही का? पोलिसांनी कारवाई न केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, अशी चिंता व्यक्त होत आहे

Exit mobile version