Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

स्टेजवर डान्स सुरू, अचानक स्फोट! गोवा नाइटक्लब दुर्घटनेचा व्हिडिओ समोर

स्टेजवर डान्स सुरू, अचानक स्फोट! गोवा नाइटक्लब दुर्घटनेचा व्हिडिओ समोर

गोव्यातील अर्पोरा परिसरात असलेल्या एका नाइटक्लबमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुर्घटना होण्याच्या काही क्षणांपूर्वी स्टेजवर एका महिला डान्सरचा कार्यक्रम सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अचानक मोठा स्फोट होतो आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर आगीनं व्यापला जातो.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, नाइटक्लबमध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात होते का, याचा तपास केला जात आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

Exit mobile version