Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

कर्वेनगरमध्ये भरदिवसा गॅस सिलेंडर चोरी; सीसीटीव्हीत कैद

कर्वेनगरमध्ये भरदिवसा गॅस सिलेंडर चोरी; सीसीटीव्हीत कैद

पुणे – शहरातील कर्वेनगर भागात भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. भारतगॅस कंपनीच्या अधिकृत टेम्पोतून एका दुचाकीस्वाराने तीन भरलेले गॅस सिलेंडर चोरून नेल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि काही सेकंदांतच टेम्पोमधील तीन सिलेंडर उचलून पसार झाला. ही घटना इतकी वेगाने घडली की, उपस्थितांना काहीच समजले नाही.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हा प्रकार अत्यंत धाडसी आणि धक्कादायक असल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गॅस वितरण करणाऱ्या एजन्सींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version