Site icon SATARK MAHARASHTRA NEWS 24X7

गणेश बिडकर यांचा “जनसंवाद कार्यक्रम” नागरिकांमध्ये ठरतोय आश्वासक…

Ganesh Bidkar’s “Jansamvad Program” Brings Hope to Pune Citizens – Committed Public Service in Action

पुणे | माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आपल्या रास्ता पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ आणि इतर प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी गेल्या १३ दिवसांपासून ‘जनसंवाद कार्यक्रम’ हाती घेतला आहे. घराघरात जाऊन लोकांच्या अडचणी जाणून घेणे, त्यावर तात्काळ उपाययोजना करणे आणि नागरिकांचे समाधान करणे – हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ठरले आहे.

गणेश बिडकर यांच्याकडून “वन कॉल – प्रॉब्लेम सॉल्व” ही अनोखी योजना देखील राबवली जात असून, नागरिकांनी केलेल्या एका फोन कॉलवर त्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जात आहेत.

हॉस्पिटलमधील ऍडमिशन, बिल, किंवा उपचाराच्या गरजा असतील, तर गणेश बिडकर स्वतः धाव घेतात आणि कोणतीही वेळ न पाहता नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. त्यांच्या टीमद्वारेही गरजूंना आवश्यक सेवा तात्काळ पुरवण्यात येत आहे.

सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून बिडकर यांनी आपल्या कार्यालयात महा ई-सेवा केंद्र उघडले आहे. येथे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड दुरुस्ती, इ. सेवा पूर्णतः मोफत दिल्या जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि त्यावर तात्काळ मदतीसाठी धावणारा नेता म्हणून गणेश बिडकर आज पुणेकरांच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहेत.

Exit mobile version