पर्यटकावर हत्तीचा झडप; जीव वाचवण्यासाठी धावपळ
कर्नाटकमधील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये फोटो काढण्याच्या नादात एका पर्यटकावर हत्तीने हल्ला करून त्याला जखमी केले. रविवारी सायंकाळी तामिळनाडूमधून गुंडलुपेटकडे जात असलेला आसाममधील युवक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हत्तीच्या जवळ फोटो काढण्यासाठी गेला. त्याचवेळी हत्तीने त्याचा पाठलाग करून लाथ मारत खाली पाडले. सुदैवाने युवकाचा जीव वाचला. त्यानंतर त्याच्या सोबत्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर वन्यजीव प्रेमींनी पर्यटकाच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.